Monday, March 17, 2008

तिबेटी भूमिपुत्रांविरोधात चीनचे 'युद्ध'

तिबेटी भूमिपुत्रांविरोधात चीनचे 'युद्ध'

'संस्कृती'विरोधातील आक्रमण रोखण्यासाठी तिबेटी जनतेने सुरू केलेले आंदोलन रणगाड्यांच्या चाकांखाली व बंदुकीच्या नळीच्या टोकावर चिरडून टाकू, अशी दपोर्क्ती चीनने रविवारी केली. संपूर्ण जग चीनला सबुरीचा सल्ला देण्यासाठी सरसावले असताना 'लोकयुद्धा'चे लेबल लावत चीनने तिबेटी भूमिपुत्रांविरोधात युद्धच पुकारले आहे.

"चिनी राजवटीकडून तिबेटमध्ये सांस्कृतिक कत्तल सुरू झाली आहे. दहशतीच्या बळावर ते शांतता लादू पाहत आहे. त्यामुळे मान्यवर आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत तिबेटमधील चिनी दडपशाहीची चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी रविवारी केली. " हे आंदोलन थांबविण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments: